नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धनज (खु) ता.लोहा येथे गायरान जमीनीवर मुरूम का टाकला आणि कडबा का ठेवतेस या कारणासाठी दोन जणांनी एका 70 वर्षीय महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे.
काशाबाई पिराजी गायकवाड (70) या अनुसूचित जातीच्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 जून रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास मौजे धनज (खु) ता.लोहा येथील गायरान जमीनीवर जी जमीन आम्ही धरलेली आहे. त्यावर तु मुरूम का टाकलास आणि कडबा का ठेवते असे सांगून मल्हारी सावळे आणि राजू सावळे यांनी तिला जातीवाचक शिवीगाळ केली आहे.
उस्माननगर पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 352, 351(2)(3), 3(5) सोबत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 (1)(आर)(एस) प्रमाणे मल्हारी सावळे आणि राजू सावळे यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 112/2025 दाखल केला आहे.
मौजे धनज (खु) येथे गायरान जमीनीच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ
