नांदेड (प्रतिनिधी)-डॉ. आंबेडकरनगर येथील ज्येष्ठ उपासिका हिराबाई हिरामण कार्ले (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी दुपारी २ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून, शांतीधाम, गोवर्धनघाट, नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हिराबाई कार्ले यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, दोन मुली, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. त्या पिपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे चेअरमन तसेच अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद, बावरी नगर (दाभड, ता. अर्धापूर, जि. नांदेड) चे संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांच्या लहान भगिनी होत. Kanthak Suryatal Post Views: 479 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation उस्माननगर पोलिसांची कारवाई; चार जणांकडून धारदार शस्त्र जप्त भारतातील भ्रष्टाचाराचे वास्तव: कारवाईऐवजी केवळ सरकारी तिजोरीतून भरपाई !