नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धनज (खु) ता.लोहा येथे गायरान जमीनीवर मुरूम का टाकला आणि कडबा का ठेवतेस या कारणासाठी दोन जणांनी एका 70 वर्षीय महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. काशाबाई पिराजी गायकवाड (70) या अनुसूचित जातीच्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 जून रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास मौजे धनज (खु) ता.लोहा येथील गायरान जमीनीवर जी जमीन आम्ही धरलेली आहे. त्यावर तु मुरूम का टाकलास आणि कडबा का ठेवते असे सांगून मल्हारी सावळे आणि राजू सावळे यांनी तिला जातीवाचक शिवीगाळ केली आहे. उस्माननगर पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 352, 351(2)(3), 3(5) सोबत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 (1)(आर)(एस) प्रमाणे मल्हारी सावळे आणि राजू सावळे यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 112/2025 दाखल केला आहे. Kanthak Suryatal Post Views: 903 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूर न.पं.मध्ये मुख्याधिकारी जगदीश दळवी भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – मुख्य निवडणूक अधिकारी