नांदेड (प्रतिनिधी)- गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या रेती माफियांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन टिप्पर आणि रेती असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन वाहनचालक व वाहनमालकांचा शोध सुरू आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार २६ जून २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिराजवळ, असर्जन (ता. जि. नांदेड) येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दोन टिप्पर (क्रमांक MH-24 J 6064 आणि MH-04 FP 1452) अडवून तपासणी केली असता त्यामध्ये परवानगीशिवाय रेतीची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.या कारवाईत प्रत्येकी सुमारे ३ लाख रुपये किमतीचे दोन टिप्पर तसेच १५ हजार रुपयांची रेती असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी युवराज अंबादास जाधव (रा. गोवर्धनघाट, ता. जि. नांदेड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या टिप्परचा चालक व मालक अद्याप अज्ञात असून त्यांचा शोध सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर व त्यांच्या पथकाने केली. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 855 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मनपा निवडणूक अर्जासाठी बोगस जात वैधता प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी काँग्रेसच्या महिला नगरसेविकेवर गुन्हा दाखल नांदेड ग्रामीण पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई; पाच आरोपींविरुद्ध दोन गुन्हे; ७२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त