उस्माननगर (प्रतिनिधी) – उस्माननगर पोलिसांनी अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या चार जणांविरुद्ध कारवाई करत त्यांच्याकडून लोखंडी धारदार खंजीर जप्त केला. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा व भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, २७ जून रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास उस्माननगर येथील समता कॉलेजच्या पाठीमागील रस्त्यावर चार संशयित व्यक्ती शस्त्रासह फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. झडती दरम्यान आरोपींकडून एका काळ्या रंगाच्या म्यानामध्ये ठेवलेला धारदार व टोकदार लोखंडी खंजीर जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत शेख सुफियान, शेख समीर, शेख दस्तगीर आणि मुस्तफा फिरोज पठाण या चौघांविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाम्ब रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. Kanthak Suryatal Post Views: 1,202 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शांती कराराचा अंत? अमेरिका-ईरान संघर्षाचे नवे आणि गंभीर वळण ज्येष्ठ उपासिका हिराबाई कार्ले यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार