मुखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील दिपनगर येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिपनगर येथील रहिवासी राजाराम तुळशीराम कदम यांच्या घरात ही चोरी झाली. दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते दि. १५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या प्रकरणी राजाराम कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७९/२०२६ नोंद करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) व ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस विभागाकडून सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. Kanthak Suryatal Post Views: 648 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रसंगावधान, धाडस आणि मानवतेची झलक; पोलीस दलाचा विश्वासार्हतेचा दीपस्तंभ उंचावला दिवसाढवळ्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या; सोमठाणा परिसरात खळबळ