नांदेड (प्रतिनिधी) – दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद किनवट येथे आयोजित केली असुन यंदा विविध क्षेञा मध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवराचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे यंदा महात्मा फुले शिक्षक रत्न 2026 चा पुरस्कार प्रभू सटवाजी सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद किनवट चे मुख्य अयोजक राहुल कापसे यांनी प्रशिध्दी पञकाव्दारे दिली. प्रभू सावंत हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांनी केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर दलित पँथर, भारिप बहुजन महासंघ, तसेच विविध शिक्षक संघटनांमध्ये कार्यरत राहून समाजातील वंचित व शोषित घटकांसाठी संघर्ष केला आहे. त्यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सचिव ते प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे त्यांच्या नेतृत्वात अनेक सकारात्मक सामाजिक चळवळींना गती मिळाली. प्रभु सावंत यांना आज तागायत मिळालेले मान्यताप्राप्त पुरस्कार रिपब्लिकन मित्र पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, धम्मरत्न पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तुफानातील दिवे वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार आंबेडकर फेलोशीप या पुरस्कारांनी त्यांच्या सामाजिक कार्याला मिळालेली दाद अधोरेखित होते. दिनांक 15 जानेवारी किनवट येथे होणाऱ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत प्रभू सावंत यांना महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे व उपसभापती अन्नाजी बनसोड आमदार भीमराव केराम कार्यक्रमाचे आयोजक दयाभाऊ पाटील निमंत्रक अभय नगराळे स्वागत अध्यक्ष प्रा. डॉ.मोहनराव मोरे आदींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे . सावंत सरांना हा पुरस्कार जाहीर होताच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. म. न. पा. गटनेते इंजि.प्रशांत इंगोले अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देविदास बस्वदे प्रा. जे.टी. जाधव शिवाजी भदरगे प्रा. अविनाश नाईक वामनराव कावळे रवींद्र सोनकांबळे मायाभाऊ नांदेडकर आदिने त्यांचे अभिनंदन केले आहे.वास्तव न्यूज लाईव्ह परिवाराच्यावतीने सुद्धा आदरणीय प्रभू सावंत यांचे अभिनंदन. Kanthak Suryatal Post Views: 718 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation परळी वैजनाथमध्ये 13 फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन ; राज्यातील पशुपक्षी पालकांना सहभागी होण्याचे आवाहन अज्ञानाचा भयावह परिणाम; सरपंच होण्याच्या नादात पित्याने केली मुलीची हत्या