नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीस ठाण्यासमोरील दुभाजकाजवळ एका व्यक्तीची 1 लाख 8 हजार रोख रक्कम असलेली बॅग कोणी तरी दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. या बाबत बिलोली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गंगाधर मलप्पा आऊळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 जून रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास ते बिलोली पोलीस ठाण्यासमोरील डीवायडरजवळ असले असतांना हा प्रकार घडला. त्या अगोदर त्यांनी बॅंकेतून 1 लाख 48 हजार रुपये काढले. त्यातील 40 हजार रुपये पत्नीला देवून तिला बिलोली बसस्थानकात सोडले आणि उर्वरीत 1 लाख 8 हजार रुपये घेवून ते आपल्या दुचाकी वाहनावर बसून बिल्लारी ता.मुधोळ जि.निजामाबाद या गावाकडे जात असतांना पोलीस ठाणे बिलोलीच्या समोरील दुभाजकाच्या जवळ दोन जण दुचाकीवर आले आणि तुमचे मतदानपत्र खाली पडले आहे. असे सागितले. तेंव्हा त्यांनी आपली दुचाकी थांबवून मतदान ओळखपत्र उचलण्यासाठी गेले असतांना त्यांच्या दुचाकीवरील 1 लाख 8 हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग घेवून ते दोघे चोरटे पळून गेले. बिलोली पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 149/2025 नुसार दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक कमल शिंदे अधिक तपास करीत आहेत.
बिलोली पोलीस ठाण्यासमोर 1 लाख 8 हजार रुपयांची चोरी
