नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील बसस्थानकाच्या ब्रिजखाली असलेले एक घरफोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे, देवाची पितळी मुर्ती आणि पितळी भांडे असा 1 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिलाबाई अशोक गोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 मे रोजी रात्री 4 वाजेच्यासुमारास शिवाजीनगर भागात बस स्थानकाच्या पुलाखाली असलेले त्यांचे घर फोडून चोरट्यांनी त्यातून काही सोन्याचे दागिणे, देवाची पितळी मुर्ती आणि काही पितळेचे भांडे असा एकूण 1 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 193/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस अंमलदार अकोसकर हे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,084 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड शहरातील वजिराबाद आणि शिवाजीनगर पोलीसा ठाण्याच्या प्रांगणात उभ्या असलेल्या बेवारस वाहनांची ओळख पटविण्यासाठी जनतेला आवाहन किनवट तालुक्यातील धामनदरी गावात 5 लाख 80 हजारांची चोरी