नांदेड(प्रतिनिधी)-78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या जनतेला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुभकामना प्रेषित केल्या. पोलीस उपमहानिरक्षिक कार्यालयात आणि पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वातंत्र्य दिन समारोह उत्साहात साजरा झाला.
आज 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले. या प्रसंगी खा.अशोकराव चव्हाण, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, गंगाधर पटणे, अमर राजूरकर, दिलीप कंदकुर्ते या लोकप्रतिनिधींसह पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर जिल्हाधिकारी बोरगावकर यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सैनानी, बालक, बालिका हे उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला अभिजित राऊत यांनी शुभकामना दिल्या.त्यानंतर जिल्ह्यातील विशेष सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांचा सन्मान केला. गुणवंत शालेय विद्यार्थ्यांना सन्मान करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी स्वातंत्र्य सैनिकांना भेटले, लोकप्रतिनिधींची भेट घेतली आणि स्वातंत्र्य दिन समारोह उत्साहात साजरा झाला.
पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयातील ध्वजारोहण पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, मानवी हक्क विभागाचे पोलीस अधिक्षक योगेशकुमार, इतवाराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांची उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर शहाजी उमाप यांनी उपस्थितांची भेट घेवून त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभकामना दिल्या.
पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपस्थितांना 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभकामना दिल्यानंतर त्यांनी अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी आणि मंत्रालयीन कर्मचारी यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या.
पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयात आणि पोलीस अधिक्षक कार्यालयात अनेक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार ध्वजारोहणासाठी उपस्थित होते. राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे यांच्या नेतृत्वात सर्वच ठिकाणी पोलीसांनी भारतीय ध्वजाला मानवंदना देवून सन्मान केला. पोलीस वाद्य पथकाने राष्ट्रीय धुन वाजवून मानवंदना दिली.