नांदेड(प्रतिनिधी)-सहयोग नगर येथील निवासी दौलतराव आनंदराव पाडमुख यांचे आज दि.03 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 76 वर्ष होते.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा नगरपालिकेचे ते सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, नाती नातवंड व तीन बहिणी असा परिवार आहे. दिवंगत दौलतराव पाडमुख हे दै.समीक्षाचे संपादक रूपेश पाडमुख यांचे वडील होते.
संपादक रूपेश पाडमुख यांना पितृशोक
