नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध जुगारावर मोठी कारवाई करत तब्बल 2 लाख 78 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 14 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे 1.05 वाजताच्या सुमारास माळटेकडी रोड परिसरातील मोकळ्या जागेत करण्यात आली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 399/2026 नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण 2,78,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईदरम्यान शेख अहमद शेख सलीम, मोहम्मद नावीद मोहम्मद रफीक, सय्यद अजर, सय्यद अर्जद, फिरोज खान, अजहर खान यांच्यासह इतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उप निरीक्षक बी.एन.चव्हाण,पोलीस अंमलदार शेख जमीर,कदम,हणमंत तेलंग यांनी ही कारवाई केली. तसेच संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छापा टाकून जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईमुळे परिसरात अवैध जुगार व्यवसायावर आळा बसण्यास मदत होणार असून पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 740 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्हा युवा पुरस्कारासाठी 22 एप्रिलपर्यत अर्ज करण्याचे आवाहन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; निळ्या जनसागराने न्हाऊन निघाले शहर