नांदेड(प्रतिनिधी)-रावी ता.मुखेड या गावात दोन भावांचे घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 17 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नागनाथ माधवराव कोये यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 ऑगस्टच्या दुपारी 1.30 ते 6.30 वाजेदरम्यान रावी गावातील त्यांचे आणि त्यांच्या भावाच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि एक सोन्याचा नेकलेस, मंगळसुत्र, अंगठी, चांदीचे पैंजण, चांदीची वाटी, रोख रक्कम असा एकूण 2 लाख 17 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. मुक्रमाबाद पोलीसांनी हा घटनाक्रम भारतीय न्याय संहितेच्या कलम 305, 331(3) नुसार गुन्हा क्रमांक 162/2024 प्रमाणे पोलीस दप्तरी दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास मुक्रमाबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भालचंद्र तिडके करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 776 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू राज्यात 12 उपजिल्हाधिकारी आणि 15 तहसीलदारांना नवीन नियुक्त्या