नांदेड (प्रतिनिधी)- शहरात खंडणी मागणीच्या गुन्ह्यांत सक्रिय असलेल्या चार जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ही माहिती वजीराबाद पोलिसांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांच्या जनसंपर्क विभागामार्फत प्रसिद्धीसाठी दिली आहे. या प्रकरणातील आरोपी पुढीलप्रमाणे आहेत – मनप्रीतसिंघ उर्फ सोनू सुरजसिंघ औलख (रा. गुरुद्वारा गेट क्रमांक 3, जवळ नांदेड) करमजीतसिंघ उर्फ ऋषी मनजीतसिंघ भाटिया (वय 35, रा. गुरुद्वारा गेट क्रमांक 3,जवळ नांदेड) कुलविंदरसिंघ उर्फ कुणाल नानकसिंघ महाजन (वय 28, रा. भोई गल्ली, चिखलवाडी, नांदेड) गणपतसिंघ गेंदासिंघ मठवाले (वय 35, रा. गुरुद्वारा गेट क्रमांक 2 जवळ, नांदेड) या चौघांविरुद्ध नांदेड जिल्ह्यात खंडणी मागणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मनप्रीत सिंघविरुद्ध 6, करमजीतसिंघ विरुद्ध 6, कुलविंदरसिंघ विरुद्ध 5, तर गणपतसिंघ विरुद्ध 9 गुन्ह्यांची नोंद आहे.आरोपी आर्थिक लाभासाठी समाजातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, वैद्यकीय व्यावसायिक आणि बांधकाम व्यवसायिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी या प्रकरणात मकोका कायदा लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे पाठवला होता. दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास शहर उपविभागाचे पोलीस उपा अधीक्षक रामेश्वर व्यंजने यांच्याकडे सोपवण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे व इतर पोलिसांच्या सहकार्याने उपा अधीक्षक रामेश्वर व्यंजने यांनी चौघांविरुद्ध मकोका कायदा जोडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. पुढील तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 2,327 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंदजी यांना तुरुंगात पाठवण्याची तयारी पूर्ण झाली गोदावरीत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा कारवाईचा भडका; लाखोंचे साहित्य जप्त व नष्ट