सामाजिक समता सप्ताह समारोप संपन्न नांदेड – महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय गट कार्यालय लेबर कॉलनी नांदेड येथे दि.14 एप्रिल 2026 मंगळवार रोजी दुपारी ठिक 12 वाजता भारतरत्न पुरमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती (ज्ञाण दिन) म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. व सामाजीक समता सप्ताहाचा समारोप यावेळी करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजीक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, शाहीर ॲड.सतिश राऊतखेडकर, केंद्र प्रमुख विलास मेंडके, शेषराव फाळके, प्रसाद शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम गुणवंत एच.मिसलवाड यांच्या हस्ते क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर सामाजीक समता सप्ताहानिमित्त शाहिर ॲड.सतिश राऊतखेडकर यांनी शाहिरी, पोवाडे व गित उत्तम प्रकारे सादर केली. सदरील कार्यक्रम कामगार कल्याण अधिकारी गट कार्यालय नांदेडचे प्रसाद धस यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी मा.श्री. गुणवंत एच.मिसलवाड यांनी आपले विचार मांडले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशासाठी मोठे योगदान असून त्यांनी आंतरराष्ट्रीय 22 देशाच्या कायद्याचा अभ्यास केला असे प्रतिपादन केले. प्रमुख वक्ते म्हणून पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी वैयक्तीक जीवनात चाळीस हजार पुस्तकांचे, ग्रंथांचे वाचन करून भारतीय राज्यघटना ही अथक परिश्रमाने लिखान करून दोन वर्षे अकरा महिने आठरा दिवस परिश्रम घेवून या भारत देशाला महान असे संविधान ग्रंथ सुपूर्द करून भारत देश एकसंघ ठेवण्याचे महान कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचालन केंद्र प्रमुख विलास मेंडके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रीमती अर्चना शिवनखेडकर, श्रीमती मंदा कोकरे, श्रीमती अरूणा गिरी, श्रीमती उषा गवई, नामदेव तायडे यांनी मोलाचे परिश्रम घेतले. Kanthak Suryatal Post Views: 576 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; निळ्या जनसागराने न्हाऊन निघाले शहर नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला; उष्माघातापासून वाचण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे नागरिकांना आवाहन