सांस्कृतिक वारसा आणि मानवतेवर आघात तेहरान (प्रतिनिधी)- इराणची राजधानी तेहरान येथील महात्मा गांधी रुग्णालयावर झालेल्या भीषण हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर संतापाची लाट उसळली आहे. पत्रकार नवीन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला इतका भीषण होता की, मुलांच्या उपचारासाठी ओळखले जाणारे हे महत्त्वपूर्ण रुग्णालय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या घटनेने केवळ आरोग्य सेवांवरच नाही, तर भारत आणि इराणमधील खोलवर असलेल्या सांस्कृतिक संबंधांवरही आघात केला आहे.फादर लॅन्डने भारताच्या महापुरुषाच्या नावाने असलेल्या महात्मा गांधी रुग्णालयावर हल्ला ३ मार्च रोजी करण्यात आला होता. तेथे लहान बालकांवर उपचार होत होते. हे रुग्णालय इराण सरकारने बनवले नाही तर महात्मा गांधींच्या विचारावर चालणाऱ्या इराणी नागरिकांनी बनवलेले होते. आता इतक्या उशिरा हि माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीतील दाव्यानुसार, इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात तेहरानमधील महात्मा गांधी रुग्णालय पूर्णपणे क्षतिग्रस्त झाले आहे. हे रुग्णालय विशेषतः मुलांच्या उपचारांसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जात असे. युद्धजन्य परिस्थितीत निष्पाप मुलांच्या आरोग्यासाठी वाहिलेल्या वास्तूवर झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय मानला जात आहे. इराणमध्ये महात्मा गांधी यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे. या आदरापोटीच तेहरानमधील अनेक रस्ते आणि संस्थांना गांधींचे नाव देण्यात आले आहे . हे रुग्णालय केवळ एक वैद्यकीय संस्था नसून ते भारत आणि इराणमधील सांस्कृतिक मैत्रीचे प्रतीक होते. २००८-०९ मध्ये काही खासगी इराणी डॉक्टर्स आणि तज्ञांनी एकत्र येऊन या रुग्णालयाची स्थापना केली होती, जे गांधींच्या विचारांप्रती असलेल्या त्यांच्या प्रेमाची साक्ष देते. या हल्ल्यानंतर व्हिडिओमध्ये इस्रायल आणि अमेरिकेवर कडाडून टीका करण्यात आली आहे. शाळा आणि रुग्णालयांसारख्या नागरी सुविधांना लक्ष्य करणे हे युद्ध गुन्हे (War Crimes) असल्याचे म्हटले आहे. युद्धात मुलांच्या रुग्णालयांना लक्ष्य करणे हे मानवतेच्या विरोधात असल्याचे सांगत या देशांना युद्ध गुन्हेगार म्हणून संबोधले गेले आहे. पत्रकार नवीन कुमार यांनी या घटनेच्या निमित्ताने भारतातील सध्याच्या राजकीय वातावरणावरही भाष्य केले आहे. त्यांनी नमूद केले की, जिथे इराणसारख्या देशात गांधींना एक महान व्यक्तिमत्व मानून त्यांचा सन्मान केला जातो, तिथे स्वतःच्या देशात (भारतात) काही लोक त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडतात आणि नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करतात. ही तुलना गांधींच्या जागतिक वारशावर आणि भारतातील सद्यस्थितीवर उपरोधिक प्रकाश टाकते. तेहरानमधील महात्मा गांधी रुग्णालयाचा विनाश हा केवळ एका इमारतीचा अंत नसून, तो एका सांस्कृतिक पुलाचा आणि हजारो मुलांच्या आशेचा अंत आहे. गांधींचे नाव धारण करणाऱ्या या वास्तूवर झालेला हल्ला हा शांतता आणि अहिंसेच्या विचारांना दिलेले एक आव्हान मानले जात आहे. भारतातील इराणी दूतावासाने या बाबत आपला निषेध व्यक्त केला आहे. महात्मा गांधींच्या नावावर इराणमध्ये अनेक रस्ते,अनेक चौक,अनेक गल्ल्या, अनेक संकुले आहेत. इराण मधील स्रवत मोठे रुग्णालय होते हे. मिनाफ मध्ये सुद्धा १६४ बालिकांना यांनीच मारून टाकलेले आहे. Kanthak Suryatal Post Views: 483 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हुमाँयू कबीरने सांगितले स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ खरा नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला; उष्माघातापासून वाचण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे नागरिकांना आवाहन