नांदेड – जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2026 असून, अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवती व संस्थांनी या पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांच्याशी संपर्क साधावा असेही कळविले आहे. राष्ट्र व राज्याच्या उभारणीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून राज्यातील युवक व विविध संस्था सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. युवांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे व त्यांचा गौरव करणे आवश्यक आहे. राज्याच्या युवा धोरणांतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 12 नोव्हेंबर 2013 च्या शासन निर्णयानुसार राज्य युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन 2025-26 या वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कारांतर्गत जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 1 युवक, 1 युवती आणि 1 नोंदणीकृत संस्था यांची निवड करण्यात येणार आहे. अर्जदारांनी सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक कार्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, तसेच राज्य व देशाच्या साधनसंपत्तीचे जतन आणि दुर्बल घटकांसाठी स्वयंप्रेरणेने केलेले कार्य यामध्ये योगदान दिलेले असणे अपेक्षित आहे. अर्जासोबत संबंधित कार्याचे पेपर कात्रणे, छायाचित्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच मागील तीन वर्षांच्या कार्याचा आढावा, पुढील दोन वर्षे सातत्याने सामाजिक कार्य करण्याचे हमीपत्र व चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे : युवक व युवती यांना प्रत्येकी रु. 10 हजार रुपये रोख, संस्थेस 50 हजार रुपये, याशिवाय गौरवपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 573 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गंभीर बेरोजगारीचे संकट आणि भारतासमोरील आव्हाने नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई; 2.78 लाखांचा मुद्देमाल जप्त