विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांची उपस्थिती; शतकोत्तर झाली सप्तरंगी साहित्य मंडळाची काव्यपौर्णिमा
नांदेड- येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरमहा येणाऱ्या पौर्णिमेचे औचित्य साधून काव्यपौर्णिमा हा कविसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. आता मी काव्यपौर्णिमा शतकापार गेली असून गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेली या महिन्यातील १०७ वी काव्यपौर्णिमा नुकत्याच पार पडलेल्या २१ व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात ख्यातकीर्त विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवयित्री ज्योती परांजपे ह्या होत्या तर विद्रोही कवी विवेक मवाडे, काॅ. डॉ आदिनाथ इंगोले, यवतमाळ येथील सुप्रसिद्ध कवयित्री अर्चना खोब्रागडे, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा काव्यपौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, मारोती कदम, कैलास धुतराज, मुख्य संयोजक गणेश शिंगे, संयोजन समितीचे अध्यक्ष उन्मेश ढवळे, निमंत्रक जी. पी. मिसाळे आदींची उपस्थिती होती.
सत्यशोधक विचार मंच आणि मनपा कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात २१ व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांच्या उपस्थितीत सप्तरंगी साहित्य मंडळाची १०७ वी काव्यपौर्णिमा रंगली यात संभाजी खंडागळे, प्रा. सुनीलचंद्र सोनकांबळे, रुपाली वागरे वैद्य, प्रतिभा पांडे, भाग्यश्री आसोरे, अलका मुगटकर, ज्योती पतिंगराव, सुजाता पोपुलवार, सावित्री शेवाळकर, उषाताई ठाकूर, बालिका बरगळ, मा. ह. देशमुख उंचेगांवकर, आ. ग. ढवळे, डी. एन. मोरे खैरकेकर, जीवन मांजरमकर, प्रकाश ढवळे नागलगांवकर, राहुल वाडे, शिवाजी गोडबोले, शंकर माने, अशोक कुबडे, गजानन हिंगमिरे, साईनाथ रहाटकर, थोरात बंधू, दत्ताहरी कदम, धर्मश्री लोणे आदी कवी कवयित्रींनी सहभाग नोंदविला.
लोकशाही मूल्ये, विषमता, संघर्ष, सामाजिक वास्तव आणि परिवर्तनाच्या भावनांना शब्दरुप दिले. १०७ वी काव्यपौर्णिमा ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरली. सहभागी कवी कवयित्रींना सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने काव्यवाचन केल्याबाबतचे प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. काव्यपौर्णिमेचे प्रास्ताविक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन मुळावा येथील कवी सज्जन बरडे यांनी केले तर आभार राज गोडबोले यांनी मानले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कोंडदेव हाटकर, श्रावण नरवाडे, प्रभू ढवळे, लालबाजी घाटे, विजय गोणारकर, राहुल गवारे, शनिदास वाघमारे, एन. टी. पंडित, रमेश कांबळे, संजय जाधव, एम. डी. जोंधळे, आर. पी. झगडे, रमेश कसबे, शोभा कोकरे, गंगाधर धडेकर, रंजिता गजभारे, अर्चना गवारे, पी. के. खानापूरकर, सुमेधा हाटकर आदींनी परीश्रम घेतले. कविसंमेलनाला विचारवंत, स्री पुरुष काव्यरसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
