कंधार येथे 80 हजारांचे दोन बैल चोरीला

कंधार (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे रूई पत्राचे शेडमधून शेतकऱ्याचे दोन बैल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 15 ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या बैलांची किंमत सुमारे 80 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कंधार येथील शेतकरी शेषराव भुजंगा गोंदलवाड (वय 65) यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेले दोन बैल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. चोरीस गेलेल्या बैलांची एकूण किंमत अंदाजे 80 हजार रुपये आहे. याप्रकरणी शेषराव गोंदलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे कंधार गुरनं. 314/2026, कलम 303(2), भारतीय न्याय संहिता-2023 अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ/गिते करीत असून, चोरीस गेलेल्या जनावरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!