नांदेड – नांदेड नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नागरिक नरसिंग मोहनराव पावडे यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समहिते 78 वर्षांचे होते. दिवंगत केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे तथा भाग्यनगर येथील ज्येष्ठ नागरिक, माजी नगरसेवक नरसिंगराव मोहनराव पावडे यांचे आज दिनांक 29 जून रोजी दुपारी 2 वाजता निधन झाले. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या आणि बीएससी ऍग्री अशी उच्च पदवी मिळवलेल्या नरसिंग पावडे यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 1985 ते 92 या कालावधीत नांदेड नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून लोकसेवा केली होती. कृषी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातही त्यांनी भरीव असे योगदान दिले होते. सत्य साईबाबा समितीचे ते प्रचारक होते. आज 29 जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. दिवंगत नरसिंग पावडे यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 30 जून रोजी सकाळी 11 वाजता गोवर्धन घाट समशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुलं , सुना , एक मुलगी , जावई , नातवंड असा मोठा परिवार आहे. ते ऍडव्होकेट निलेश पावडे यांचे वडील तर माजी महापौर जयश्री निलेश पावडे यांचे सासरे होत. Kanthak Suryatal Post Views: 813 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये घरात घुसून मारहाण व विनयभंग करणाऱ्या चौघांना तीन वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा श्री गुरु हरगोबिंद साहिब जी यांच्या पवित्र प्रकाश पर्वानिमित्त विशेष धार्मिक सोहळ्याचे आयोजन