नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील जुन्या मोठ्या टॉवर मैदान परिसरात एका वृद्धाच्या खिशातील ७ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जुना मोठा टॉवर मैदान, नांदेड येथे फिर्यादी नारायण विठ्ठलराव जाधव (वय ६५, रा. जवळा, ता. लोहा) हे मैदानात बसले असताना आरोपींनी संगनमत करून त्यांच्या खिशातील ७ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी रुपेश दादाजी जगवळे (वय २३, रा. शिवाजीनगर, मालेगाव, जि. नाशिक), बादल करुणसिंग आणि दत्ता नारायण भरकड़े यांच्यासह आणखी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी नारायण जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस अमलदार सरोदे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,155 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आंबेडकरवादी साहित्य संमेलनात रंगली काव्यपौर्णिमा जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला; एक जखमी, आरोपी अटकेत