नांदेड (प्रतिनिधी)-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कॅनरा बँक शाखा नरसी-नायगाव शाखतर्पेâ सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमातंर्गत डॉ.आंबेडकर कॅनरा विद्या ज्योती शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
हा कार्यक्रम श्री शंकर हायस्कूल नरसी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कॅनरा बँक शाखा नरसी-नायगाव शाखेचे व्यवस्थापक गंगाधर जाधव, शाळेचे अध्यक्ष प्रकाशराव भिलवंडे, मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे, शाळेचे ज्येष्ठ संचालक व कॅनरा बँकेचे शाखा नरसी-नायगावचे अधिकारी अमोल सोनकांबळे यांच्या हस्ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अनु.जाती, अनु.जमातीतील गुणवंत विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. वर्ग ५ ते ७ वी पर्यंत रुपये ३०००/ व वर्ग ८ वी ते १० वी पर्यंत रुपये ५००० अशी रक्कम देण्यात आली.
या प्रसंगी बोलताना शाखा व्यवस्थापक गंगाधर जाधव हे म्हणाले की, कॅनरा बँक ही राष्ट्रीयकृत बँक नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास व वंचित घटकातील विशेषतः अनु.जाती, अनु.जमातीतील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहनपर कॅनरा विद्या ज्योती योजनेचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमास श्री शंकर नगर शाळेचे अध्यक्ष प्रकाशराव भिलवंडे, शिंदे, शाळेचे संचालक तसेच कॅनरा बँकेचे अधिकारी अमोल सोनकांबळे, भगवान भोसले, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंटे यांनी केले तर आभार मिरकुटे यांनी मानले.