नांदेड (प्रतिनिधी) -लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांमधील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल उत्कृष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे. यामध्ये नांदेड परिक्षेत्र कार्यालयासह नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या चारही जिल्ह्यांतील कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परिक्षेत्र स्तरावरील मानकरी: नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह आस्थापनेवरील प्रदीप ज्ञानोबाराव पांचाळ, भागवत व्यंकटराव शिवनकर, अमोल मुंजाजी टाक, मारोती भुजंगराव मुलगोर आणि चंद्रकांत पांडुरंग पाटील या सहा जणांना हे प्रतिष्ठेचे पदक प्राप्त झाले आहे. जिल्हानिहाय पदक विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे आहे: नांदेड युनिट: गजानन जनार्धन राऊत, प्रदीप धारोजी कंधारे, रमेश हुलबाराव नामपल्ले, अर्शद अहमद सरफराज खान, साईनाथ बालाजी आचेवाड, जगन्नाथ परमेश्वर अनंतवार, यशवंत बापूराव दावनवाड, मेनका गोपिनाथ पवार, प्रकाश लक्ष्मण मामुलवार आणि राजेश दैवासिंग राठोड. लातूर युनिट: पोलीस निरीक्षक संजय संदीपान केसरे, फारूकपाशा लाडलेसाब दामटे, भागवत नरसु कटारे, भीमराव वैजनाथ आलुरे, शाम बाबुराव गिरी आणि संतोष गोविंदराव क्षीरसागर. परभणी युनिट: रविंद्र योगीराज भुमकर, चंद्रशेखर राधाकिशन निलपत्रेवार, सिमा तुळशीदास चाटे आणि नामदेव रामभाऊ आदमे. हिंगोली युनिट: मो. युनूस मो. सिद्दीक, विजय गणपत शुक्ला, शेख अकबर शेख मन्नार, रविंद्र होनाजीराव वरणे, भगवान लक्ष्मण मंडलीक, राजाराम विश्वनाथ फुफाटे, गोविंद गंगाराम शिंदे, योगीता प्रकाशराव अवचार आणि अमोल विनायकराव जाधव. या सर्व अधिकारी आणि अंमलदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यशस्वी पोलीस अमलदारांचा सत्कार केला. या यशाबद्दल श्रीकृष्ण कोकाटे आणि सर्व पोलीस अमलदारांचे अभिनंदन होत आहे.वास्तव न्यूज लाईव्ह परिवाराच्यावतीने सर्वांचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभकामना. Kanthak Suryatal Post Views: 907 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड बसस्थानक परिसरात मध्यरात्री तरुणाचा खून; दोन आरोपीना अटक भाजपमध्ये भूकंप: अमित मालवीय यांची सुट्टी, शाह यांचा नवीन मास्टरस्ट्रोक की २०२९ ची पूर्वतयारी?