ना वतन, ना भाषा, ना कपडे… राजीव गांधींसाठी इटालियन सोनिया कशा बनल्या पूर्ण भारतीय? आर्टिकल १९ चा खळबळजनक खुलासा! नवी दिल्ली (प्रतिनिधी) – राजकारणाच्या गलिच्छ अन् नफरतीने भरलेल्या वातावरणात निस्वार्थी प्रेमाला जागा असते का? राजकीय द्वेषाचा अंत प्रेमाने होऊ शकतो का? या प्रश्नांचे सडेतोड अन् जळजळीत उत्तर देणारा एक ऐतिहासिक दस्तऐवज आणि संवाद सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ७९ वर्षांच्या सोनिया गांधी यांनी जेव्हा आपल्या ६० वर्षे जुन्या प्रेमाची पाने उघडली, तेव्हा इंटरनेटवर जणू भावनांचे आणि विचारांचे प्रचंड वादळ आले. आर्टिकल १९ इंडिया या युट्यूब चॅनेलवर पत्रकार नवीन कुमार यांनी सादर केलेल्या एका विशेष विश्लेषणात्मक व्हिडिओने अवघ्या ५ तासांत सव्वा लाखांहून अधिक नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. सोनिया गांधी यांनी आपल्या पहिल्यावहिल्या बिलॉन्गिंग या पुस्तकाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली अन् एका २० वर्षांच्या इटालियन मुलीची २२ वर्षांच्या भारतीय तरुणावरील पहिल्याच नजरेतील निष्ठा आणि प्रेमाची कहाणी संपूर्ण जगासमोर आली. कॅम्ब्रिजची ती वळणवाट अन् पहिल्याच नजरेतील चुंबकीय आकर्षण १९६५ च्या सुमारास इंग्लंडमधील कॅम्ब्रिज शहरात या ऐतिहासिक प्रेमकथेची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीच्या व्हेनेटो प्रदेशात बालपण घालवलेली सोनिया नावाची २० वर्षांची मुलगी शिक्षणासाठी कॅम्ब्रिजमध्ये आली होती. त्या एका संध्याकाळी सोनिया आपल्या आवडीचे युरोपियन अन्न शोधत फिरत होत्या, जे तिथे सहजासहजी मिळणे कठीण होते. शोध घेत असताना त्यांना कॅम्ब्रिजमध्ये एक ग्रीक रेस्टॉरंट सापडले, जिथे युरोपमधील आणि भारतातील विविध विद्यार्थी एकत्र जेवायला येत असत. याच रेस्टॉरंटमध्ये सोनिया यांची नजर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नातू आणि इंदिरा गांधी यांचे सुपुत्र राजीव गांधी यांच्यावर पडली. सोनिया गांधी यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, राजीव गांधी यांना पहिल्यांदा पाहताच त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात एक अद्भूत, चुंबकीय सौम्यता जाणवली. राजीव अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसत होते. नजर मिळताच सोनिया गांधींना क्षणात जाणवले की, हाच तो पुरुष आहे ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्यभर राहायचे आहे. नंतर सोनिया यांना समजले की, राजीव यांच्या मनातही पहिल्याच भेटीत अगदी तशाच भावना निर्माण झाल्या होत्या. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली; ते पार्ट्यांना एकत्र जाऊ लागले, विद्यार्थ्यांच्या बैठकीत आणि फिरण्यात वेळ घालवू लागले आणि त्यांनी आयुष्यभर एकत्र चालण्याचा ठाम निर्णय घेतला. प्रेमासाठी संपूर्ण जगाचा त्याग आणि पाटीवर कोरलेले राजीव यांचे नाव २० वर्षांच्या त्या इटालियन मुलीला तेव्हा कल्पनाही नव्हती की, ज्या परदेशी मुलावर ती हृदय हारली आहे, त्याच्यामागे जाताना तिला स्वतःचे घर, आई-वडील, देश, भाषा, पोशाक, गाणी, वातावरण, नद्या, धबधबे आणि संपूर्ण जुनी दुनिया सोडावी लागणार आहे. सोनिया गांधी यांनी आपल्या भूतकाळातील संपूर्ण विश्वाला एका पाटीवर खडूने लिहिलेल्या अक्षरांप्रमाणे पुसून टाकले आणि त्यावर फक्त आणि फक्त राजीव गांधी हे नाव कोरले. सोनिया गांधी यांचा हा प्रवास केवळ नाव किंवा उपनाम बदलण्याचा नव्हता; हे एक संपूर्ण कायांतरण होते. आपल्या जुन्या ओळखीचा त्याग करून त्यांनी राजीव यांच्या आठवणींचे आणि प्रेमाचे एक नवे जग उभारले. त्या भारतात आल्या, त्यांनी जवाहरलाल नेहरू आणि सासूबाई इंदिरा गांधी यांची भेट घेतली व त्या नेहरू-गांधी घराण्यात विवाहबद्ध झाल्या. भारतात आल्यावर त्यांनी भारतीय जीवनशैलीशी पूर्णपणे जुळवून घेतले; हिंदी भाषा शिकली, साडी नेसणे स्वीकारले आणि भारतीय अन्न व संस्कृती पूर्णपणे आत्मसात केली. भीषण शोकांतिका, रक्ताने माखलेला इतिहास अन् त्यागाची पराकाष्ठा सोनिया आणि राजीव गांधी यांचे हे जीवन केवळ रोमान्सपुरते मर्यादित राहिले नाही, तर त्यांना इतिहासातील अत्यंत क्रूर आणि भीषण राजकीय वादळांचा सामना करावा लागला. कॅम्ब्रिजमध्ये भेटलेल्या त्या २० वर्षांच्या मुलाच्या आईला, म्हणजेच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना, लग्नानंतर अवघ्या १८ वर्षांनी पंतप्रधान निवासात गोळ्या झाडून ठार करण्यात आले. या धक्कादायक घटनेनंतर राजीव गांधी यांना अत्यंत कठीण परिस्थितीत पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावी लागली आणि त्यांनी जागतिक इतिहासातील सर्वात मोठ्या बहुमताने सरकार चालवले. परंतु, नियतीचा क्रूर खेळ येथेच थांबला नाही. पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या ७ वर्षांत राजीव गांधी यांचीही बॉम्बस्फोटात निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या पुरुषासाठी सोनिया गांधी यांनी आपला देश आणि सर्वस्व सोडले होते, तोच पुरुष त्यांच्यापासून कायमचा हिरावून घेण्यात आला. तरीही ती स्त्री खचली नाही. राजीव यांच्या मृत्यूनंतरही सोनिया गांधी राजीव यांच्या श्वासांवर, राजीव यांच्या मातीवर, राजीव यांच्या देशावर आणि त्यांच्या स्मृतींवर जगत राहिल्या. नफरतीच्या राजकारणावर निस्वार्थी प्रेमाचा आक्रमक प्रहार आर्टिकल १९ इंडिया च्या विश्लेषणात नवीन कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, सोनिया गांधी यांची ही कहाणी केवळ एका पुस्तकाचे पान नाही, तर तो द्वेषाच्या राजकारणावर प्रेमाने केलेला आक्रमक प्रहार आहे. ज्यांना प्रेमाचा अर्थ समजत नाही, जे नफरतीच्या तेजाबाने प्रेमाचे ऋतू जाळून टाकू इच्छितात, त्यांना ही कहाणी कधीच समजणार नाही. परंतु, शिकारी कितीही कपटी असोत, ते पक्षांची संपूर्ण प्रजाती मिटवू शकत नाहीत. सोनिया गांधी यांनी राजीव यांच्यासोबतचे प्रेम तर जगलेच, पण राजीव यांच्या हत्येनंतर त्यांच्या राजकारणाला आणि वारसालाही प्रेमाची जोड दिली. ज्यांच्या मनात केवळ नफरत भरलेली आहे, त्यांच्या नीचतेचा विचार न करता सोनिया गांधी यांनी आपल्या प्रत्येक श्वासावर राजीव यांचे नाव कोरले आहे. ज्या प्रेमात स्वतःचे काहीच शिल्लक ठेवले नाही ना वतन, ना भाषा, ना बोली, ना परिधानफक्त आणि फक्त राजीव या नावाचा जप केला, अशा प्रेमावर आणि बलिदानावर इतिहासही नतमस्तक होतो. Kanthak Suryatal Post Views: 12 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तुरुंगात हनुमान चालीसा, बाहेर हप्तेखोरीचे जाळे: लॉरेन्स बिश्नोई आणि अंडरवर्ल्डच्या बदलत्या पॅटर्नची संपूर्ण कहाणी! नेहरूंनी वाजपेयींच्या मागणीवर २६ दिवस चर्चा घडवली; मोदी चीनचे नाव घ्यायलाही २६ सेकंद घाबरतात?