कंधार (प्रतिनिधी) – कंधार शहरातील गाऊळ परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाऊळ ता. कंधार येथील रहिवासी विठ्ठल दत्तात्रय हेंडगे (वय ३७) यांच्या घराच्या दरवाजाची साखळी वाकवून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ८९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी विठ्ठल दत्तात्रय हेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ) व ३३१(४) प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पोउपनि/गारोळे करीत आहेत. घरफोडीच्या या घटनेमुळे कंधार परिसरात चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 20 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोह्यात बंद घराचे कुलूप तोडून १ लाख ६८ हजारांचा ऐवज लंपास