खबर आप तक आणि एचआरडी न्यूजच्या माध्यमातून डॉ. प्रा. कैलाश भानुदास यादव यांनी फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, वेब पोर्टल आदी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून आंबेडकरी चळवळीतील विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, आंदोलने आणि प्रबोधनात्मक कार्याला व्यापक व्यासपीठ मिळवून दिले. त्यांच्या पत्रकारिता कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
युगकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे संयुक्त जयंती सोहळा–२०२६ निमित्त पुरस्काराचे वितरण रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक गौतम कदम असून अध्यक्षस्थानी शंकरदादा चंद्रे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले, गटनेते तथा नगरसेवक, मनपा नांदेड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत गायकांच्या सहभागातून बुद्ध-भीम गीतांची संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अखिल भारतीय यादव महासभेचे बिशनकुमार यादव, गोकुल यादव, राधाकिशन लक्ष्मणजी यादव, दुर्गाप्रसाद गणेशलाल यादव, जयवर्धन भोसीकर, भारतभूषण यादव, गगन लालमन यादव, संजय फुलारी, गोपाल फतेहलश्करी, सतीश यादव, राजेश कुलकर्णी, रोशन यादव आदींनी डॉ. प्रा. कैलाश भानुदास यादव यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या पुरस्कार सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजय निवडगे यांनी केले आहे.
