नांदेड ग्रामीण पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) –  शहरातील विश्वकर्मा मंदिराच्या पाठीमागे हडको परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ३८ हजार ८४० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १० ते दि. १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.३० वाजेदरम्यान ही घरफोडी झाली. विश्वकर्मा मंदिराच्या पाठीमागे हडको, नांदेड येथे राहणारे कैलास दत्ता चोपवाड (वय ४३) यांच्या घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. घराच्या कुलपाची कोंडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी कैलास दत्ता चोपवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं. १४८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(४) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल यालावार करीत आहेत. या घटनेमुळे हडको परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!