नांदेड (प्रतिनिधी) – श्रीकृष्ण आणि श्रीराम हे भारताचे आराध्य दैवत आहेत. आपल्या देशात या दैवतांचा जन्म अतिशय उत्साहात साजरा केला जातो. 4 सप्टेंबर ला श्रीकृष्ण जन्माष्टमी, जन्मोत्सवानिमित्त श्रीकृष्ण मंदिर, काबरानगर येथील विश्वस्तानी 27 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर, दररोज संध्याकाळी 5 ते 7 श्रीकृष्णकथामृत च आयोजन केलं आहे. परमपूज्य वरदानंद भारती रचित श्रीकृष्णकथामृत म्हणजे कृष्ण चरित्राचे नवनीत आहे. आणि त्यांचे शिष्योत्तम ह. भ. प. श्री विक्रमजी नांदेडकर यांच्या अमोघ, रसाळ वाणीतून श्रीकृष्ण कथा ऐकायला मिळणार ही नांदेडकरां साठी या पवित्र श्रावण महिन्यातील पर्वणीच आहे. श्रीकृष्ण मंदिर विश्वस्तानच्या वतीने सर्व नांदेडकरांना श्रीकृष्णकथामृत ऐकण्याचा अलभ्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 569 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डॉ. प्रा. कैलाश भानुदास यादव यांना तुफानातील दिवे पत्रकारिता पुरस्कार जाहीर आज कार्यक्रमांमध्ये सुरु असलेल्या बफे पद्धतीवर सरदार राजेंद्र सिंघ शाहू यांचे विचार