६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा आज शुभारंभ; ३ डिसेंबरपर्यंत नाट्यप्रयोगांची मेजवानी नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला आज, गुरुवार दि. १९ नोव्हेंबरपासून नांदेड येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नांदेडकर रसिकांना सलग १२ दिवस मराठी रंगभूमीवरील विविध विषयांवरील दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. नांदेड येथील नाट्यप्रेमींना १९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता विविध नाट्यसंस्थांचे प्रयोग पाहण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील हौशी रंगभूमीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि मराठी नाट्यपरंपरेचा समृद्ध वारसा पुढे नेणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. या स्पर्धेत नांदेड व परभणी जिल्ह्यांतील विविध नाट्यसंस्था सहभागी होत असून, विविध विषय, आशय आणि नाट्यप्रकारांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. आज १९ नोव्हेंबर, गुरुवार रोजी ‘अस्तोदय’ सादरकर्ता : झपुर्दा सोशल फाउंडेशन, परभणी, २० नोव्हेंबर, शुक्रवार रोजी ‘जेनवेव सादरकर्ता : तन्मय ग्रुप, नांदेड, २१ नोव्हेंबर, शनिवार रोजी ‘गर्भ’सादरकर्ता : स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड, २३ नोव्हेंबर, सोमवार रोजी ‘कुंपणा पलीकडले’ सादरकर्ता : लीला आर्ट्स फाउंडेशन नांदेड, २४ नोव्हेंबर, मंगळवार रोजी ‘भयरात्र’ सादरकर्ता : राजीव गांधी युवा फोरम, परभणी, २५ नोव्हेंबर, बुधवार रोजी ‘अकल्पित स्मृती’ सदरकर्ता : ओम प्रतिष्ठान, परभणी, २६ नोव्हेंबर, गुरुवार रोजी ‘बंड्या तुमच्या उरावर’ सादरकर्ता : नाट्यनाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड, २७ नोव्हेंबर, शुक्रवार रोजी ‘नटसम्राट’ सादरकर्ता : ज्ञान विज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड, ३० नोव्हेंबर, सोमवार रोजी ‘सहज सुचलं म्हणून’ सादरकर्ता : अष्टविनायक कला क्रीडा व सेवा प्रतिष्ठान, परभणी, १ डिसेंबर, मंगळवार रोजी ‘मीना’ सादरकर्ता : शिवशंभो बीज प्रतिष्ठान, नांदेड, २ डिसेंबर, बुधवार रोजी ‘द्विगत” सादरकर्ता : बालगंधर्व सांस्कृतिक कला क्रीडा व युवक मंडळ, परभणी, ३ डिसेंबर, गुरुवार रोजी ‘एका तळ्यात होती’ सादरकर्ता : क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी ही नाटके सादर होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेला राज्यभरातील नाट्यसंस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, तब्बल ५४२ नाट्यसंस्थांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. राज्यातील २४ केंद्रांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेतील पारदर्शकता आणि परीक्षक निवड प्रक्रियेतील गुणवत्ता वाढविण्यासाठी यंदा प्रथमच परीक्षकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रणाली राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेला विक्रमी २०३ अर्ज प्राप्त झाले असून, त्यातून ७२ तज्ज्ञ परीक्षकांची निवड करण्यात आली आहे. नाट्यकलेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या या स्पर्धेमुळे स्थानिक नाट्यरसिकांना राज्यभरातील विविध नाट्यसंस्थांचे प्रयोग अनुभवता येणार आहेत. नांदेडच्या सांस्कृतिक वातावरणात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या नाट्यमहोत्सवाला नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. ही सर्व नाटके डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे दररोज सायंकाळी ७ वाजता होणार असून यासाठी शासनातर्फे फक्त रुपये १५ व रुपये १० असे तिकीट आकारण्यात आलेले आहे. नांदेडकर रसिकांसाठी ही केवळ नाट्यस्पर्धा नसून मराठी रंगभूमीचा कलाविष्कार अनुभवण्याची एक अनोखी पर्वणी ठरणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 30 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वीरा हाक्के, अमोल मालेगावकर, विजय जोशी व स्थानिक कलावंतांनी सादर केलेल्या ऋतुचे रंग सणाचे तरंग कार्यक्रमाला रसिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद