नांदेड – सप्तरंग सेवाभावी ,जिल्हा प्रशासन नांदेड विशेष सहाय्यक संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कुसुम सभागृह नांदेड येथे सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2026 मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर ,नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर, विशेष सहाय्यता कक्ष प्रमुख मुख्यमंत्री धर्मदाय सहायता मदत व निधी कक्ष महाराष्ट्र राज्य रामेश्वर नाईक यांचे हस्ते संपन्न झाला . भारतीय संस्कृती परंपरा अधिक घट्ट करण्याचा हा महोत्सव कुसुम सभागृहाच्या मंच क्रमांक एक स्वर्गीय आशाताई भोसले व मंच क्रमांक दोन स्वर्गीय तीजन बाई मंचावरती गायन वादन इन्स्ट्रुमेंट तबला गिटार सतार महाराष्ट्रातील संगीत स्पर्धेन कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच खुल्या संगीत आणि वाद्य गायन स्पर्धा आयोजित केल्या होत्या या अनेक राजासह महाराष्ट्रातून तब्बल पाचशेच्या जवळपास आलेल्या कलाकारांनी सहभाग नोंदवला तर पहिल्या स्टेज वरती दक्षिण भारतातील लोककला नांदेडकरांची मन जिंकत होती सप्तरंग महोत्सव दिनांक 14 15 आणि 16 असा तीन दिवस चालणार असून.गेल्या अनेक वर्षापासून नांदेड शहरांमध्ये सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव एक राष्ट्रीय मंच म्हणून उदयास आला या कार्यक्रमांमध्ये नाट्य प्रकारातील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी कलाकारांना देशाच्या कानाकोपऱ्यामधून बोलवलं जातं या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका डॉ सानवी जेठवाणी यांच्या अथक परिश्रमामधून कार्यक्रमाला मूर्त रूप प्राप्त झाला आहे हा कार्यक्रम दररोज दोन सत्रामध्ये म्हणजे सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत अविरतपणे चालू असून या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपरातून नावाजलेल्या दिग्गज कलाकारासह आणि दिग्गज गुरुसह हाजरी लावण्यात आलेली आहे हा कार्यक्रम सतत तीन दिवस कुसुम सभागृहामध्ये चालणारा असून या कार्यक्रमाला दररोज सायंकाळी सामूहिक नात्याने लावणी या विशेष कार्यक्रमात सादर होणार आहेत तर उद्घाटन सत्रात सादर केलेल्या लोककला, लावणी, नृत्य आणि नाटक यांनी प्रेक्षक भारावून गेले या कार्यक्रमात लावणीच्या आदा प्रेक्षकांना पाहून प्रेक्षक घायाळ झाले अशीच पुढील दोन दिवस सुद्धा लावणे दररोज पाहायला मिळणार आहे सप्तरंग महोत्सव हे केवळ एक नृत्य आणि संगीत प्रकार नाही तर हे भारतीय संस्कृती व विविधता आणि समृद्धी एक जिवंत प्रदर्शन आहे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव मागील दहा वर्षापासून आपल एक वेगळे स्थान भारतामध्ये निर्माण केला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सदिच्छा सोनी सभापती शिक्षण महिला व बालकल्याण नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका उपस्थित होत्या संयोजन समितीचे डॉ सान्वी जेठवाणी अध्यक्ष सप्तरंग सेवाभावी संस्था संस्थेचे सचिव अक्षय लक्ष्मणराव कदम संस्थेचे उपाध्यक्ष अब्दुल नईम खान संस्थेचे सहसचिव गणेश चांडोळकर डॉ. बालाजी पेनुरकर प्राध्यापक डॉ ओमप्रकाश दरक ज्योती पाटील प्रा डॉ. लक्ष्मी पुराणशेट्टीवार कविता जोशी परीक्षक तमन्ना नायर मुंबई परीक्षक कुशल भट्टाचार्य कोलकाता डॉ प्रा अश्विनी चौधरी प्रमोद देशपांडे डॉ उज्वला सदावर्ते हरीश लालवानी प्राध्यापक ओमप्रकाश दरक आदी मान्यवर उपस्थित होते Kanthak Suryatal Post Views: 446 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राष्ट्रीय नृत्य-संगीत स्पर्धा, भव्य आरोग्य शिबिर आणि तृतीयपंथी सक्षमीकरण परिषदेसह विविध उपक्रमांचे आयोजन तृतीयपंथाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – अतुल सावे