नांदेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संवाद बैठकीला प्रतिसाद
नांदेड(प्रतिनिधी) -आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून तसेच 2029 ची विधानसभा आणि लोकसभा या निवडणुका लक्षात ठेवून कार्यकर्त्यांनी पक्षसंघठनेचे कार्य अधिक प्रभावीपणे करून पक्षाची राजकीय ताकत वाढविली पाहिजे. जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करतील अशांची दखल घेवून त्यांना संधी दिली जाईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशीकांत शिंदे यांनी केले.
प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे दि.17 जुलै रोजी नांदेड येथे दौरा होता. त्यांनी सर्वप्रथम नांदेड शहरातील महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच शहरातील चंद्रलोक हॉटेल येथे संवाद बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी व्यासपीठावर माजी आ. सुनील भुसारा, निरीक्षक हिंगोली पंकज बोराडे, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, जिल्हाध्यक्ष भगवान आलेगावकर, धनंजय सुर्यवंशी, कल्पना डोंगळीकर, प्रांजली रावणगावकर, मनबिरसिंघ ग्रंथी, जर्नेलसिंघ गाडीवाले रमेश देशमुख शिळवणीकर आदी जणांची उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कुठल्याही पक्षामध्ये विलीन होणार नाही. किंबहूना एनडीए ला पाठिंब देणार नाही. त्यामुळे अशा अफवांवर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला नाही पाहिजे. जोपर्यंत खा.शरदचंद्रजी पवार भूमिका जाहिर करणार नाहीत तोपर्यंत अशा बाबींना कार्यकर्त्यांनी मनावर घेतले नाही पाहिजे. 2029 ची लोकसभा आणि विधानसभा राष्ट्रवादीला लढायची आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आपला पक्ष नंबर 1 क्रमांकाचा पक्ष कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आपले आमदार निवडूण येवू शकतात. नांदेडमध्ये आपल्या पक्षाला पोषक वातावरण आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून पक्ष संघठनेचे काम प्रभावी करावे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगले काम करतील त्यांना पद देण्यात येईल. ज्या ठिकाणी नवीन पदाची आवश्यकता आहे तेथे विस्तार केला जाईल. तसेच त्यांनी जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर यांनी जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेबद्दल आढावा सांगून जिल्ह्यात पक्षाची राजकीय ताकत अधिक वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर माजी मंत्री माधवराव किन्हाळकर यांनी लोकशाही वाचविण्यासाठी आपण सर्वांनी प्रभावी काम करायला हवे असे म्हणत भारतीय जनता पार्टीच्या धोरणावर त्यांनी चौफेर टिका केली. यावेळी रऊफ जमीनदार, आनंद पाटील, रमेश पाटील, प्रमोद देशमुख यासह अनेक जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. आयोजित केलेल्या संवाद बैठकीला नांदेड शहर आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.