नांदेड – येथील यशवंतराव चव्हाण शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडूक रणधुमाळी सुरू असून शिक्षक एकता पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत सत्ता बदलाचे वारे दिसून येत वाहत असल्याने सदर निवडणुक सभासदांनीच आपल्या हाती घेतल्याचे चित्र जिल्हाभर पाहावयास मिळत आहे. या पतसंस्थेवर गेली २२ वर्षापासून शिक्षक परिषदेची सत्ता असून पतसंस्थेची एकूण सभासद संख्या बाराशे इतकी असली तरी मागील संचालक मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे पतसंस्थेचे जवळपास साडेपाचशेच्या वर सभासद थकबाकीदार असून शेकडो सभासद आपल्या ठेवी परत मिळणार या आशेवर आहेत. थकबाकीदार सभासदांकडे लाखो रुपये रक्कम थकीत असल्यामुळे पतसंस्थेच्या कर्ज वितरणावर याचा मोठा परिणाम दिसून झाला होता.
यास संचालक मंडळाचा दिसाळ कारभार कारभार कारणीभूत असल्याचे दिसून येताच सहकार खात्याने सदर संस्थेवर तीन वर्षापासून प्रशासकीय अंमल चालवलाआहे. प्रशासक येण्यापूर्वी कार्यकारी मंडळ अस्तित्वात असताना ही पतसंस्था पूर्णपणे डबघाईस आली होती. सत्ताधारी मंडळींच्या सत्ताकाळात पतसंस्था सत्तेचाळीस लाख तोट्यात होती. पतसंस्थेच्या पैसाचा खाजगी वापर करत तत्कालीन अध्यक्षांच्या मदतीने नेत्यानींच आपली घरे भरण्याच काम करण्यात धन्यता मानली होती. सताधारी मंडळींना प्रचारादरम्याण सभासदां पूढे निरुत्तर व्हाव लागत असल्याच दिसत आहे. प्रशासकीय कालावधीमध्ये प्रशासकांच्या पतसंस्थेला सावरण्यासाठी प्रयत्न चालवले असले तरी अजूनही आर्थिक स्थाती चिंताजनक असल्याचे बोलल्या जात आहे. या निवडणूकीत शिक्षक नेते देविदास बस्वदे यांच्या नेतृत्ववा खाली शिक्षक एकता पॅनल ने सत्ताधारी पॅनल विरोधात तगडे आव्हान उभे केले आहे.
शिक्षक नेत्याचे कर्ज न भरताच फाडलेल्या पावतीची चर्चा..!
सत्ताधारी मंडळातील एका माजी अध्यक्षांनी तिन लाख त्र्याण्णव हजार रुपयाचे आपल्या शिक्षक नेत्याचे कर्ज पतसंस्थेत न भरताच परस्पर स्वतःच्या अधिकारात पावती फाडून आपल्या नेत्याचे उपकार फेडून पतसंस्थेस गंडवल्याचीही जोरदार चर्चा आहे. दरम्यान मागील वीस वर्ष सत्ताधारी मंडळाचा गलथान कारभार आणि मनमानीने तसेच सभासदांना कर्ज वाटपात केलेला अन्याय या बाबी आता चर्चेत असून या पतसंस्थेमध्ये सत्ता परिवर्तन दिशेने ही निवडणूक वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत एकता पॅनलने प्रचारांमध्ये चांगलीच मुसंडी घेतल्याचे दिसत असून सत्ताधारी पॅनल बचावात्मक पवित्र्यात दिसत आहे.
