मुखेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना रेती वाहतूक करणारा हायवा ताब्यात घेतला. या कारवाईत सुमारे 40 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना नरसी ते मुखेड मार्गावर विनापरवाना रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून एमएच-04-जेयू-0486 क्रमांकाचा हायवा अडविण्यात आला. तपासणीदरम्यान वाहनात सुमारे पाच ब्रास रेती आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेला रॉयल्टी परवाना अथवा अन्य वैध कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी चालक उद्धव रामचंद्र भरकडे (रा. कौडगाव, ता. लोहा) तसेच वाहनमालक कृष्णाजी दशरथ भरकडे यांच्याविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.पोलीस निरीक्षक व तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली असून, जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधातील कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 494 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्ह्यात घरफोडीच्या दोन घटना; तीन लाखांसह पोषण आहार साहित्याची चोरी, अवैध रेती वाहतुकीवरही कारवाई अर्धापूर पोलिसांची कामगिरी: तीन गंभीर गुन्हे उघडकीस, सहा आरोपींना जेरबंद करत मुद्देमाल जप्त