नांदेड (प्रतिनिधी) – हदगाव परिसरात गाई तपासण’च्या नावाखाली ट्रक अडवून चालक व क्लिनरवर जीवघेणा हल्ला, दगडफेक आणि लुटीचा प्रकार घडल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. २३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वारंगा–हदगाव मार्गावर ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर वास्तव न्यूज लाईव्ह च्या बातमी नंतर खुनाचा प्रयत्न (कलम 109) हे कलम जोडण्यात आले आहे. केरळमधील अल्विन हा चालक KA-20-AC-4284 क्रमांकाचा ट्रक घेऊन नागपूरकडे फळांची वाहतूक करत होता. दरम्यान काही व्यक्तींनी ट्रक अडवून “गाडीत गाई आहेत का?” अशी चौकशी सुरू केली. अधिकृत अधिकार नसतानाही चौकशी केल्याने चालकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसऱ्या वाहनातून आलेल्या जमावाने ट्रकचा पाठलाग करत दगडफेक केली व काही अंतरावर ट्रक जबरदस्तीने थांबवला. ट्रक थांबल्यानंतर चालक व क्लिनर नदाफ कुरेशी यांना खाली उतरवून मारहाण करण्यात आली. ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या. विशेष म्हणजे, ट्रकमध्ये फळे असल्याचे स्पष्ट दिसत असूनही तोडफोड सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. याच वेळी ट्रकमधील सुमारे ४० हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन लंपास केल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे. जखमी अवस्थेत दोघांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले, नंतर त्यांना नांदेड येथे हलवण्यात आले. दरम्यान, या घटनेला वेगळे वळण तेव्हा मिळाले जेव्हा सामाजिक व राजकीय संघटनांनी प्रकरणात हस्तक्षेप केला. एआयएमआयएमचे स्थानिक नेते सय्यद मोईन यांनी रुग्णालयात भेट देऊन एफआयआरची प्रत तपासल्यानंतर तक्रारदाराच्या कथनात आणि पोलिस नोंदीत मोठी तफावत असल्याचा आरोप केला. त्यानंतर वास्तव न्यूज लाईव्ह नाही ही बातमी प्रसिद्ध केली.या बातमीच्या परिणामात आता या पुण्यामध्ये भारतीय दंड संहितेप्रमाणे जीवघेणा हल्ला भारतीय न्याय संहितेप्रमाणे कलम 109 जोडण्यात आले आहे. तक्रारदाराच्या मते हा प्रकार लूट, जबरी चोरी आणि जीवघेणा हल्ला असा गंभीर आहे. मात्र सुरुवातीच्या पोलिस नोंदींमध्ये केवळ दुखापतीचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच, जखमा धारदार शस्त्रामुळे झाल्याचा दावा असताना ‘पंचने मारहाण’ झाल्याचे पोलिसांकडून सांगितले गेल्याने संशय अधिकच वाढला आहे. हदगाव पोलिसांनी मात्र स्पष्टीकरण देताना “जशी तक्रार आली तशी नोंद केली असून मुख्य आरोपीसह ७ जणांना अटक करण्यात आली आहे, आणि पुढील तपास सुरू आहे,” असे सांगितले. या प्रकरणामुळे तीन महत्त्वाचे प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत – लूट झाली की गैरसमज? जमावशाही की कायद्याचं राज्य? आणि सर्वात महत्त्वाचं – कागदावरचं सत्य आणि प्रत्यक्षातील घटना यात फरक का? सध्या या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी विविध स्तरांतून होत असून, सत्य नेमकं काय आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण आता पोलिसांनी खरा न्याय दिलाचे तक्रारदार अलविन सांगत होता. संबंधित बातमी… हदगावमध्ये गाई तपासणीच्या नावाखाली ट्रक क्लिनरवर हल्ला; रोख रक्कम व मोबाईल लंपास, पोलिसांचा कागदोपत्री चमत्कार पुन्हा चर्चेत Kanthak Suryatal Post Views: 786 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation घरफोडीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास, पोलिसांत गुन्हे दाखल नांदेड शहरात मटका अड्डयावर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची धाड (13) आरोपींविरुद्ध कारवाई, 92 हजारांचा मुद्देमाल जप्त