नांदेड – अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमिहीन, दारिद्ररेषेखालील शेतमजूर कुटूंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेतजमीन उपलब्ध करुन देण्याची योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेत जमीनीसाठी प्रति एकर 5 लाख रुपये मर्यादेच्या आत तसेच बागायती शेतजमीनीसाठी प्रति एकर 8 लाख रुपये मर्यादेच्या आत जिल्हास्तरीय समितीमार्फत वाटाघाटी करुन मोबदला अदा करण्यात येतो. जिल्ह्यात शेतजमीन विक्री करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकरी व व्यक्तीनी आवश्यक कागदपत्रांसह शेतजमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करावेत. आवश्यक कागदपत्रे –विहित नमुन्यातील अर्ज, सातबारा उतारा, नमुना आठ-अ, शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर नोटरी सह विहित नमुन्यातील शपथपत्र, भूमि अभिलेख कार्यालयाचा पोटहिस्सा मोजणी अहवाल, तलाठी यांचे निर्विवाद प्रमाणपत्र, मुल्यांकन प्रमाणपत्र, बँकेचे बेबाकी प्रमाणपत्र, कुटुंबातील सदस्यांचे नाहरकत प्रमाणपत्र, मागील 13 वर्षाचे फेरफार संबंधी पुरावे (सर्च रिपोर्ट), इतर आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना, शपथपत्रांचे नमुने व अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 574 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कामगार-कर्मचार्यांच्या देशव्यापी संपाच्या तयारीसाठी 6 रोजी नांदेडमध्ये व्यापक बैठक जागतिक कर्करोग दिन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा