नांदेड (प्रतिनिधी) -राष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त कामगार-कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने येत्या 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. हा संप यशस्वी करण्याच्या दृष्टीने 6 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे व्यापक बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती नांदेड जिल्हा कामगार-कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक ऍड. प्रदीप नागापूरकर यांनी दिली. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या चार कामगार संहिता रद्द कराव्यात, पूर्वीचे कामगार कायदे लागू करावेत, खाजगीकरण थांबवावे, शासकीय कार्यालयांतील रिक्त पदे तातडीने भरावीत, कंत्राटी कामगार-कर्मचार्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, एलआयसी व बँकांचे खाजगीकरण व विलीनीकरण रद्द करावे, तसेच महाराष्ट्रातील जन सुरक्षा कायदा रद्द करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या देशव्यापी संपात नांदेड जिल्ह्याचा सहभाग निश्चित करण्यासाठी व पुढील रणनीती ठरविण्यासाठी ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस विविध क्षेत्रांतील कामगार-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन ऍड. प्रदीप नागापूरकर, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे समन्वयक लक्ष्मण नरमवार, कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.दिगांबर घायाळे, आयटकचे कॉ.शिवाजी फुलवळे, मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेचे कॉ. बी. के. पांचाळ, डी. पी. झगडे, बालाजी सरोदे, कॉ. गणेश शिंगे, एस. बी. मोरे, कॉ. सपना सोनकांबळे, प्रेमलता वणे, कॉ.शततारका काटकोडे, एस. ए. भालेराव आदींनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 603 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर! नवी दिल्लीत 7-8 मार्च रोजी पहिले महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत;शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतीविक्रेत्यांनी संपर्क करण्याचे आवाहन