भोकर – आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके सर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. राजाभाऊ बुट्टे, नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील ,जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.कांतीलाल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रताप चव्हाण यांच्या निरीक्षणाखाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथे ” जागतिक कर्करोग दिन ” साजरा करण्यात आला. दंत शल्य चिकित्सक डॉ.मायादेवी नरवाडे यांनी बाह्य रुग्ण विभागात रुग्णांना मौखिक कर्करोगाविषयी माहिती सांगून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितल्या तसेच या वर्षीचे घोष वाक्य ” United for Unique ” म्हणजेच ” अद्वितीयसाठी एकजूट होऊया ” हे घोषवाक्य सांगितले व सर्व रुग्णांची मौखिक तपासणी केली. तसेच एनसीडी वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर रेड्डी यांनी कर्करोगाविषयी विस्तृत माहिती सांगून प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितल्या. यावेळी डॉ. थोरवट ,डॉ. मुदसिर, सहाय्यक अधीक्षक संजय देशमुख, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, औषध निर्माण अधिकारी शिवप्रसाद जाधव, कनिष्ठ लिपिक कल्याणकर, एनसीडी समुपदेशक रेणुका भिसे, अधिपरिचारिका श्रीमती भालेराव, अधिपरिचारिका श्रीमती ज्योती शेंडगे,दंत सहाय्यक श्रीमती करंडेकर आदी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 354 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत;शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतीविक्रेत्यांनी संपर्क करण्याचे आवाहन सीबीसीएस पॅटर्नच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२६ मध्ये अंतिम परीक्षेची संधी