कंधार – दि 5 फेबु्रवारी 2024 रोजी सायं. 7 वाजता कंधार येथील डॉक्टर्स लेन परिसरात चार चाकी वाहन क्र.पी.बी.62 बी 6527 या वाहनाने डॉक्टर्स लेन परिसरातील बऱ्याच वाहनांना व काही इसमांना धडक दिल्यामुळे त्यात काही इसम साधारण स्वरुपात जखमी झाले तसेच त्या घटनेत एक लहान मुलगी सुध्दा जखमी झाली होती, त्यानुषंगाने पो.स्टे. कंधार येथे गुरनं. 35/2024 कलम 427, 279, 337, 338, 109 भा.दं.वी. नुसार आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला व त्या आरोपींना पोलीसांनी नोटीस देत मुक्त केले व न्यायालयात हजर राहण्याची समज दिली. घटनेच्या दोन महिन्यानंतर या अपघातातील जखमी मुलीने व तिच्या कुटुबियांने वाहन चालविणाऱ्या व त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर चार लोकां विरुध्द कलम 354-डी भा.दं.वी. व कलम 12 पॉक्सो कायद्यांतर्गत संबंधीची तक्रार दिली व त्यावरुन सदरील गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली.
सदरील गुन्ह्यात जवळपास 1 वर्षानंतर पोलीस ठाणे कंधार यांनी पाचही आरोपींना पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करुन न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी ऍड. नितीन सोनकांबळे यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, कंधार येथे जामीन अर्ज दाखल करीत न्यायालयाच्या निदर्शनास असे आणुन दिले की, पिडीत मुलगी तिच्या वडीलांनी अपघातानंतर आरोपीतांकडे 10 लाख रुपये ची मागणी केली व ती आरोपींनी न दिल्यामुळे पिडीत मुलीच्या वडीलांनी पोलीसांशी संगनमत करुन खोटा विनयभंगाचा व पॉक्सो कायद्याचा गुन्ह्यातील कलम वाढ करीत निर्दोष पाच युवकांना खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचे सांगितले, त्यासोबत आरोपींच्या वकीलाने युक्तिवाद करीत न्यायालयाच्या निदर्शनास असे आणुन दिले की, पिडीत मुलीच्या वडीलांनी पॉक्सो कायद्यांतर्गत कलम वाढ केल्यानंतर मोटार अपघात नुकसान भरपाईचा दावा स. न्यायालयात दाखल केला व त्या दाव्यात पिडीत मुलीच्या वडीलांनी अपघाता नंतर नुकसान भरपाईची मागणी केल्याचे निदर्शनास आणून दिले व त्या दाव्यात आरोपी लोकांनी पिडीत मुलीचा पाठलाग केला व तिस जबरदस्ती कार मध्ये ओढण्याचा प्रयत्न केला व तिच्या अंगावर गाडी घालत जखमी केले, या संबंधीचा काही एक उल्लेख केला नाही व या वरुन असे दिसुन येते की, केवळ आणि केवळ आरोपी लोकांकडुन मोठ्या प्रमाणात अपघाता संबंधी नुकसान भरपाई मागावयाची व ती न दिल्यास सदरील कलम 354-डी, भा.दं.वी. व पॉक्सो कलम 12 नुसार खोट्या गुन्ह्यात अडकवायचे. सदरील बाब ऍड. नितीन सोनकांबळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर न्यायालयाने त्या पाचही आरोपींना जामीनवर सोडण्याचे निर्देश दिले.
या प्रकरण असे होते की, वस्तुस्थिती अपघाताची असताना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई रक्कम मिळाली नसल्यामुळे पॉक्सो कायद्याचा गैरवापर करत निष्पाप तरुणांना विनाकारण जेलची हवा खावी लागली, असे ऍड.नितीन सोनकांबळे यांनी सांगितले.
अपघात प्रकरणात पोक्सो जोडण्यात आला; पाच जणांना जामीन मंजुर
