नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थेवर गेल्या अनेक वर्षापासून प्रशासकीय राज आहे. या प्रशासकीय राजमध्ये नागरीकांना मुलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागतो. याचबरोबर शेतकऱ्यांनाही शासनाकडून अनुदान व पिकाच्या हमी भावाबाबत अद्यापही ठोस पावले उचले नसल्याच्या निषधार्थ दि.3 मार्च रोजी महानगरपालिका कार्यालयासमोर कॉंगे्रस पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन करून यावेळी जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिले. सोमवारी कॉंगे्रस पक्षाच्यावतीने महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाला खा.रविंद्र चव्हाण, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम, माजी आ.हनमंतराव बेटमोगरेकर, प्रदेश सरचिटणीस राजेश पावडे, नांदेड शहराध्यक्ष माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर सतिश देशमुख, डॉ.करुणा जमदाडे, डॉ.विठ्ठल पावडे, नायगाव कॉंगे्रस तालुकाध्यक्ष संजय बेळगे, डॉ.दिनेश निखाते, श्रावण रॅपनवाड, संजय शेळगावकर, सत्यपाल सावंत, माजी उपमहापौर शमीम अब्दुला, विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ.महेश मगर यांच्यासह आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला. कॉंग्रेस पक्षाच्यावतीने यावेळी धरणे आंदोलन करण्यात आले. महापालिकेत लोकप्रनिधी नसल्यामुळे या प्रशासकीय राज कालावधीत मोठ्या प्रमाणात गैर व्यवहाराचे कारभार वाढले आहेत. नागरीकांना पिण्याच्या पाण्यासह रस्ते, दिवाबत्ती या मुलभूत सुविधेचाही सामना करावा लागत आहे. अनेकदा लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला जाब विचारला असता त्यांच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे आली. याचबरोबर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव या महायुतीच्या सरकारमध्ये कवडीमौल झाला आहे. केंद्रीय मंत्र्यांचीही मुलगी या राज्यात सुरक्षीत नसल्याने गृह खाते आहे की नाही असा प्रश्न खा.चव्हाण यांनी उपस्थित करत राज्य आणि केंद्र सरकारवर खा.चव्हाण यांनी हल्ला बोल चढवला. Kanthak Suryatal Post Views: 560 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महाराष्ट्र सरकारच्या महायुतीत सर्व काही आनंदात नाही पोलीस आणि महसुल प्रशासनाची येळी रेती घाटावर संयुक्त कार्यवाही; 2 कोटी 48 लाखांचे साहित्य जप्त