नांदेड, (प्रतिनिधी)- 1 ऑगस्ट 2026: वैध तिकीटधारक (बोनाफाईड) प्रवाशांना आरामदायी व विनाअडथळा प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे, विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालणे तसेच रेल्वे महसुलाचे संरक्षण करणे या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वाणिज्य विभागामार्फत 31 जुलै 2026 रोजी 05:00 ते 20:30 या कालावधीत श्री शैलेश कुमार सिंह, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (ACM), नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मॅसिव्ह तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या विशेष मोहिमेत विभागातील 24 गाड्यांची तपासणी करण्यात आली. अभियानात 28 तिकीट तपासणी कर्मचारी तसेच रेल्वे सुरक्षा दल RPF) कर्मचारी सहभागी झाले. सर्व तिकीट तपासणी पथकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. या अभियानादरम्यान एकूण 339 विनातिकीट व अनियमित प्रवासाची प्रकरणे आढळून आली असून त्यांच्याकडून ₹2,33,300 इतका रेल्वे महसूल वसूल करण्यात आला. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे: * विनातिकीट प्रवास (TWT): 226 प्रकरणे – ₹2,00,685 * **अनियमित प्रवास (IRT * 20 प्रकरणे – ₹15,815 * बुक न केलेले सामान (UBL): 93 प्रकरणे – ₹16,800 हे अभियान नांदेड विभागाच्या वैध तिकीटधारक प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास उपलब्ध करून देणे, रेल्वे महसुलाचे संरक्षण करणे आणि प्रवाशांमध्ये तिकीटासह प्रवासाबाबत जनजागृती निर्माण करणे या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. रेल्वे प्रशासन सर्व प्रवाशांना विनंती करते की, कृपया वैध तिकीट किंवा योग्य प्रवास प्राधिकरणासहच प्रवास करावा. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे महसुलाच्या संरक्षणासाठी अशा विशेष तिकीट तपासणी मोहिमा भविष्यातही नियमितपणे राबविण्यात येतील. Kanthak Suryatal Post Views: 744 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अंगदान जीवन संजीवनी अभियान २०२६ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद शेख जाकीर शेख सगीरने जातीचे प्रमाणपत्र बनवून दिले आणि आम्हाला फसवले