नांदेड (प्रतिनिधी) – टायनी एंजेल्स इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी प्रतिक उमाकांत दामेकर याने दहावी बोर्ड परीक्षेत ९२.४० टक्के गुण मिळवत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मेहनत, सातत्य आणि अभ्यासावरील एकाग्रतेच्या जोरावर प्रतिकने हे यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करत प्रतिकने सातारा येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. कठोर सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवले. अभ्यास आणि खेळ यांचा योग्य समतोल राखत प्रतिकने एका वर्षात मिळवलेले हे दुहेरी यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळा, शिक्षक, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात शिक्षण आणि पॉवरलिफ्टिंग या दोन्ही क्षेत्रांत आणखी मोठे यश मिळवण्याचा निर्धार प्रतिकने व्यक्त केला आहे.प्रतिक दामेकरचे वडील उमाकांत दामेकर वजिराबाद पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार आहेत.त्यांनी सुद्धा पोलीस महासंचालकांचे मानचिन्ह प्राप्त केलेले आहे. वास्तव न्यूज लाईव्ह परिवार प्रतिकचे कौतुक करीत आहे. Kanthak Suryatal Post Views: 676 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गुरुद्वारा सचखंड बोर्डातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी नांदेड–पनवेल एक्सप्रेस तीन तास उशिराने; प्रवाशांचे स्वप्न, योजना आणि भावना कोलमडल्या