नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील विमानतळ आणि इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या प्रयत्नाच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या असून, या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका प्रकरणात लोखंडी रॉडने तर दुसऱ्या प्रकरणात चाकूने हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पहिली घटना २९ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास माणिक पेट्रोल पंप, कर्मवीर नगर येथे घडली. रामा देवकर, साईनाथ गोरे आणि अक्षय मेटकर यांनी संगनमत करून फिर्यादी राजू सत्यम जायभाये (रा. गोविंद नगर) यांच्यावर “माझ्याकडे काय बघतोस” या कारणावरून वाद घालत लोखंडी रॉडने डोक्यावर व हातावर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि. शिंदे करीत आहेत. दुसरी घटना ३१ जुलै रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास महेबुबिया कॉलनी परिसरात घडली. शेख आयान शेख अजीम, ओसामा आणि मोहम्मद रेहान यांनी संगनमत करून ऑटोसमोर गाडी लावत शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर फिर्यादीचा मुलगा सलमान याच्यावर चाकूने छाती व पाठीवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार जावेदखान खाजाखान (रा. खुदबईनगर, देगलूर नाका) यांनी दिली. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक देशमुख करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,219 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्ह्यात घरफोडी, फसवणूक व चोरीच्या पाच गुन्ह्यांची नोंद कानड फाटा येथे दलित ज्येष्ठावर जीवघेणा हल्ला; तीन दिवस उलटूनही आरोपी मोकाट