नांदेड(प्रतिनिधी)-लोहा तालुक्यातील येळी रेती घाटावर उस्माननगर पोलीस आणि महसुल प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाही रविवारी रात्री उशीरा धाड टाकून कार्यवाही करण्यात आली. यामध्ये दोन लोखंडी बोट, चार हायवा, दोन जेसीबी आणि चार टिपर असा एकूण 2 कोटी 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यात आठ जणांवर उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोदावरी नदीवरील येळी घाटावर बिना परवानगी बेसुमार रेती उपसा करत असल्याची माहिती पोलीस आणि महसुल प्रशासनाला मिळाल्यानंतर या दोन्ही पथकांनी संयुक्तरित्या कार्यवाही करत यामध्ये घटनास्थळावर जाऊन रात्री उशीरा ही कार्यवाही केली. ही कार्यवाही सोमवारच्या पहाटेपर्यंत सुरू होती. यामध्ये घटना स्थळावरून चार टिपर 12 लाख रुपये किंमत, दोन लोखंडी बोट किंमत 10 लाख रुपये, दोन जेसीबी मशीन किंमत 1 कोटी रुपये चार हायवा किंमत 80 लाख असा एकूण 2 कोटी 48 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल यात जप्त करण्यात आला आहे. यामध्ये राजू कोंडीबा पाकलवाड रा.वाघाळा ता.उमरी, प्रभु माधव धसाडे रा.कौडगाव, सचिव हरीचंद्र जाधव रा.सातेगाव, दत्ताहरी लक्ष्मण खंदारे रा.रावधानोरा, माधव पिराजी झिंजोरे रा.बळेगाव, श्रावण केशव शिराळे रा.बारुळ, शहाजी मनोहर सावंत रा.हातणी आणि ज्ञानेश्र्वर दिगंबर वाघमारे रा.भायेगाव या आठ जणांविरुध्द उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्र्विनी जगताप, उपविभागीय दंडाधिकारी अरुणा संगेवार, लोहा तहसीलदार परळीकर, उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरिक्षक गजानन गाडेकर, पोलीस अंमलदार हंबर्डे, श्रीमंगले आणि महसुल विभागाचे कर्मचारी हे सहभागी होते. Kanthak Suryatal Post Views: 633 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation काँग्रेसचे महापालिकेसमोर धरणे आंदोलन एकाच नावाचे तीन युनिक आयडी क्रमांक; पश्चिम बंगालमध्ये मतदार गोंधळ