नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, फसवणूक आणि चोरीच्या पाच स्वतंत्र घटना उघडकीस आल्या असून, लाखो रुपयांच्या ऐवजाची चोरी व आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धर्माबाद शहरातील गणेश नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 4.50 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहा तालुक्यातील सोनखेड येथे पशुपालकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुधाचे उत्पादन वाढविण्याच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे उत्पादन विकून 14.77 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भोकर तालुक्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून विम्याची रक्कम स्वीकारून ती विमा कंपनीकडे न भरता 1.29 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच तालुक्यात बनावट मिक्सर विक्रीच्या माध्यमातून एका ग्राहकाची 14 हजार 975 रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी व्यापार चिन्ह अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायाळ शेतशिवारातून उभा असलेला 11 लाख रुपयांचा हायवा टिप्पर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. संबंधित सर्व प्रकरणांचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 578 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जबरी चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड, तीन आरोपी जेरबंद;विमानतळ पोलिसांची कार्यवाही पेट्रोल पंपावर रॉडने, तर महेबुबिया कॉलनीत चाकूहल्ला; खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे