नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक संपत्तीला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून त्याचा परतावा मिळवा आणि आनंदाने जीवन जगा असा सल्ला देत अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरिक्षक-1, पोलीस उपनिरिक्षक-3, ग्रेड पोलीस उपनिरिक्षक-7, पोलीस हवालदार-1 आणि पोलीश शिपाई-1 अशा 13 सेवानिवृत्त पोलीसांचा सन्मान करून त्यांना निरोप दिला.
आज नांदेड जिल्हा पोलीस दलातील 13 पोलीस सेवानिवृत्त झाले. ज्यामध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, गे्रड पोलीस उपनिरिक्षक, पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. या प्रसंगी पुढे बोलतांना अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव म्हणाले, आजच्या नंतर कामाचा व्याप राहणार नाही. हा मोकळा वेळ उत्कृष्ट कामांसाठी खर्च करा. जेणे करून पोलीस विभागात नसतांना सुध्दा पोलीसांचे नाव प्रगतीपथावर नेता येईल. तुम्हाला मिळणाऱ्या सेवानिवृत्तीनंतरच्या अनेक उपदानांद्वारे रक्कम प्राप्त होते. ही रक्कम योग्य ठिकाणी गुंतवा त्यासाठी आर्थिक सल्लागारांची मदत घ्या. जेणे करून त्या गुंतवणूकीतून मिळणारे उत्पन्न मोठे असेल. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेवून कुटूंबाला जास्त वेळ द्या आणि आनंदी जीवन जगा असा सल्ला दिला.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी सर्व सेवानिवृत्तांचा सहकुटूंब सत्कार केला. या कार्यक्रमात पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येत उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नामदेव रिठ्ठे यांनी केले. पोलीस अंमलदार सविता भिमलवाड यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे आहेत. सहाय्यक पोलीस निरिक्षक बळवंत जमादार (शहर वाहतुक शाखा वजिराबाद), पोलीस उपनिरिक्षक बळीराम राठोड(नियंत्रण कक्ष), चॉंद इब्राहिम सय्यद (मुक्रमाबाद), लहु रामजी घुगे(पोलीस नियंत्रण कक्ष), ग्रेड पोलीस उपनिरिक्षक दत्ता हसेप्पा काईतवाड(पोलीस मुख्यालय), गोरख रघुनाथ भोसीकर(विमानतळ), अंकुश रामजी घुगे(नियंत्रण कक्ष), अनिल बलप्पा श्रीवास्तव(शहर वाहतुक शाखा), कृष्णा नागनाथ जायेवार(पोलीस मुख्यालय), अब्दुल कादर अब्दुल करीम (कंधार), नागोराव संभाजी लोखंडे(गुरुद्वारा सुरक्षा पथक), पोलीस अंमलदार उत्तम माणिकराव निरडे (पोलीस मुख्यालय), बळवंत अण्णाराव बिरादार(मुक्रामाबाद).