नांदेड(प्रतिनिधी)-नालीचे पाणी घराच्यासमोर का सोडले यावरून भांडण झाल्यानंतर एका महिलेच्या डोक्यात रॉड टाकून त्यांचे डोके फोडण्यात आले. तसेच त्यांच्या दोन मुलाचे हाड फॅक्चर करण्यात आले. शेख अतिक शेख अहेमद रा.मोहम्मदीयानगर वाजेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.21 सप्टेंबरच्या सकाळी 8.30 वाजेच्यासुमारास त्यांच्या शेजारच्या लोकांनी त्यांच्या घरातील नालीचे पाणी यांच्या घरासमोर सोडले. त्यातून झालेल्या वादात त्यांच्या घराशेजारील चार जणांनी मिळून त्यांच्या आईच्या डोक्यात रॉड मारून गंभीर जखमी केले. तसेच शेख अतिकच्या हातावर मारुन तसेच त्यांचा भाऊ इमरानच्या डोक्यावर मारून त्याला जखमी केले. शेख अतिकचे वडील मध्यस्थिती करण्यासाठी आले असता त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केले. शेख अतिकच्या आईच्या डोक्यावर बरेच टाके लागले आहेत. या फिर्यादीमध्ये शौकत पठाण, हकीम पठाण, महेमुद्द पठाण, इब्राहिम पठाण या चार जणांची नावे आरोपी सदरात लिहिले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(2), 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3) आणि 3(5) प्रमाणे गुन्हा क्रमांक 857/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भारती करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 2,157 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 27 वर्षीय युवकाला गळाचिरून नदीत फेकले माळटेकडी रेल्वे रुळांवर अनोळखी युवकाचे प्रेत सापडले