नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी नदीपात्रात गळाचिरून एका 27 वर्षीय युवकाला फेकून देण्यात आले. त्याचे प्रेत पाण्यात तरंगल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पुर्ण होत आहे. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. काल दि.22 सप्टेंबर रोजी गोदावरी नदीच्या पात्रात संत दासगणु पुलाजवळ एका 27 वर्षाच्या युवकाचे गळाचिरलेल्या अवस्थेतील प्रेत सापडले. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या युवकाला दवाखान्यात नेल्यानंतर आज 23 सप्टेंबर रोजी दवाखान्यातील वैद्यकीय प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयत युवक रहिमपुर येथील रहिवासी असून त्याचे नाव शुभम गायकवाड असे आहे. Kanthak Suryatal Post Views: 2,175 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महिलेला लुटले नालीचे पाणी घरासमोर सोडल्याच्या कारणा वरून मारहाण