नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी रेल्वे स्थानकाच्या फ्लाट क्रमांक 2 वर एका अनोळखी युवकाची मानेपासून डोके वेगळे झालेले प्रेत सापडले आहे. अद्याप या युवकाची ओळख पटलेली नाही. आज सकाळी 11 वाजेच्यासुमारास माळटेकडी रेल्वे स्थानकाच्या फ्लाट क्रमांक 2 वर एक अनोळखी युवकाचे प्रेत सापडले. युवकाचे मुंडके धडापासून वेगळे झालेले आहे. प्रथमदर्शनी असे वाटते की, या युवकाने रेल्वे रुळांवर आपले मुंडके ठेवून आत्महत्या केली आहे. रेल्वे पोलीस याप्रकरणाचा तपास करीत आहेत. वृत्तलिहिपर्यंत या युवकाची ओळख पटलेली नव्हती. Kanthak Suryatal Post Views: 1,799 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नालीचे पाणी घरासमोर सोडल्याच्या कारणा वरून मारहाण किनवटमध्ये बंद घरफोडून 13 तोळे सोने चोरले; मोबाईल हिसकावला