नांदेड- येथील पत्रकार व मॅक्स महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे मराठवाडा ब्युरो धनंजय प्रल्हादराव सोळंके यांना छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्रमोद दुथडे फाऊंडेशनच्या वतीने 2024 चा राज्यस्तरीय महाकवी डॉ. वामनदादा कर्डक पुरस्कार देवून गौरव करण्यात आलाय. गेल्या पंधरा वर्षा पासून जिया न्युज,गर्जा महाराष्ट्र,महाराष्ट्र वन चॅनल,ABP माझा ते मॅक्स महाराष्ट्र सारख्या अग्रगण्य वृत्त वाहिण्यात पत्रकारिता करत मराठवाड्यातील शेतकरी, कष्टकरी,विद्यार्थी, दुर्लक्षित समाजाचे प्रश्न सरकार आणि समाजापुढे मांडून त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न प्रयत्न आपल्या वार्तांकनातून ते करतं आहेत. पत्रकरतेतील त्यांच्या योगदानाला लक्षात घेवून डॉ. प्रमोद दुथडे फाउंडेशनच्या वतीने त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. काल दिनांक 18ऑगस्ट रोजी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे तापडिया नाट्य मंदिर याठिकाणी घेण्यात आलेल्या भव्य सन्मान सोहळ्यात हजारोंच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रमोद दूथडे कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी रोख रकमेसह,शाल, श्रीफळ, गौरवचिन्ह देवून त्यांना महाकवी डॉ.वामनदादा कर्डक पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आलाय.या गौरव सोहळ्याला प्रमूख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक अनिल साबळे , व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड, शिक्षण महर्षी प्राचार्य सुनील वाकेकर रमेश पवार,डॉ, प्रमोद दुथडे, अभियांता अशोक येरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.सदर महाकवी डॉ.वामनदादा कर्डक राज्यस्तरीय समारोह रिपब्लिकन टायगर फोर्सचे अध्यक्ष विजयकुमार खंडागळे व डॉ. प्रमोद दुथडे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलाय.
More Related Articles
भुरेवार अडकला 3500 रुपयांच्या लाच जाळ्यात
नांदेड(प्रतिनिधी)-मनरेगा अंतर्गतचे 7 मस्टर पंचायत समिती किनवट येथे सादर केल्यानंतर त्यावरील पुढील कार्यवाही करण्यासाठी कंत्राटी…
नांदेडला लागलेल्या गद्दारीचा डाग पुसून काढा-खा.संजय राऊत
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडला लागलेला गद्दारांचा डाग पुसून काढा असा सल्ला शिवसेना उध्दव गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी…
अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शाळा व विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड,(जिमाका)- केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व…