प्रा. देवीदास मनोहरे व भगवान गायकवाड यांना ‘तुफानातील दिवे’ पुरस्कार जाहीर

युगकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंह बोदडे संयुक्त जयंती सोहळ्यात होणार प्रदान

नांदेड – येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सुरेशदादा गायकवाड मित्र मंडळाचे विश्वस्त प्रा. देवीदास मनोहरे व भगवान गायकवाड यांना नुकताच तुफानातील दिवे पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

प्रा. देवीदास मनोहरे व भगवान गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन तुफानातील दिवे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना जाहीर झाला असून, येत्या २४ ऑगस्ट रोजी नांदेड येथील कुसुम सभागृहात पार पडणाऱ्या युगकवी वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंह बोदडे यांच्या संयुक्त करण्यात येणार असल्याचे संयोजक संजय निवडंगे यांनी एका जयंती सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान पत्रकानुसार कळविले आहे.

 

प्रा. देवीदास मनोहरे आणि भगवान गायकवाड यांना तुफानातील दिवे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते किशोर आटकोरे, प‌द्माकर सोनकांबळे, प्रकाश सोंडारे, चंद्रमुणी कांबळे, महेंद्र कांबळे पिंपळगावकर, राजू कदम, अॅड. एम. जी. बादलगावकर, सुभाष काटकांबळे, गुणवंतराव कोलते, प्रफुल्ल गायकवाड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्याआहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!